उपोषण स्थगित करण्याचे तहसीलदारांचे आवाहन
गंगापूर, (प्रतिनिधी): किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पुढील वाढीव आदेश प्राप्त होईपर्यंत खरेदी करता येणार नसल्याचे स्पष्ट करत तहसीलदारांनी १८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले आहे.
गंगापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मण मुर-लीधर भुसारे यांनी १२ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयास निवेदन सादर केले होते. त्यानुसार १८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय येथे मका खरेदीसंदर्भात उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित यांच्या आदेशानुसार खरीप पणन हंगाम २०२० - २८ अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत मका खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. पोर्टलवरील शेतकरी नोंदीनुसार गंगापूर शाखेस १२५८ विंवटल तसेच लासूर
स्टेशन शाखेस ५८७ क्विटल मका खरेदीचे आदेश देण्यात आले होते. सदर उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर महासंघाकडून पुढील वाढीव उद्दिष्ट देण्यात आले.
त्यानुसार मनापूर (देशील) शाखेस १७४२ क्विटल व लासूर स्टेशन शाखेस ६१३ क्विटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ही दोन्ही उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तहसीलदारांनी कळविल्यानुसार, महासंघाकडून पुढील वाढीव उद्दिष्ट प्राप्त होईपर्यंत तहसील स्तरावर मका खरेदी करता येणार नाही. संबंधित आदेश प्राप्त होताच खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
















